Advertisement

'सही रे सही' म्हणत रंगणार 'एक डाव धोबीपछाड'चा डाव

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन आता चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. या घरातील सदस्यांना 'एक डाव धोबीपछाड' हे साप्ताहिक कार्य पार पाडावं लागणार आहे.

'सही रे सही' म्हणत रंगणार 'एक डाव धोबीपछाड'चा डाव
SHARES

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन आता चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. या घरातील सदस्यांना 'एक डाव धोबीपछाड' हे साप्ताहिक कार्य पार पाडावं लागणार आहे.


दोन टीम

'एक डाव धोबीपछाड'मध्ये ए आणि बी अशा दोन टीम करण्यात आल्या आहेत. नेहा शितोळे टीम ए आणि विद्याधर जोशी टीम बीचे मॅनेजर असणार आहेत, तर वैशाली माडे संचालक बनणार आहे. या टास्कमध्ये कोण कोणाला 'धोबीपछाड' देतं ते पहाणं रंजक ठरणार आहे. या आठवड्यामध्ये 'सही रे सही' या टास्कमध्ये विणा जगताप, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले, तर शिवला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केल्यानं तोदेखील थेट नॉमिनेट झाला आहे. 


हीना, वैशाली सेफ 

हीना पांचाळचा घरातील पहिला आठवडा आणि वैशाली घराची कॅप्टन असल्यानं या आठवड्यात सेफ आहेत. त्यामुळं या आठवड्यात कोण घराबाहेर जातं आणि कोणाला प्रेक्षकांची मतं मिळतात ते देखील पहायचं आहे. एक डाव धोबीपछाड या टास्कमध्ये नेहा आणि विद्याधर मॅनेजर असल्यानं नक्कीच चतुराईनं स्वत:च्या टीमला विजयी करण्याचा मार्ग काढतील आणि त्यासाठी आवश्यक ते उपायही करतील. प्रतिस्पर्धी टीमला या टास्कमध्ये हरवतील का तेदेखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


बिचुकले यांची शाळा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कधी कोणाच्या बाजूनं बोलेल, पाठ फिरताच कोण वार करेल, कोणता सदस्य कोणाला भडकवायचा प्रयत्न करेल हे कळणं अवघड असतं. अभिजीत बिचुकले हे सुरेखा पुणेकर यांना घरामध्ये त्यांची आई मानतात. त्या आईच्या जागी असल्याचं त्यांनी बऱ्याचदा बोलूनही दाखवलं आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या वीकेंडचा डावमध्ये सुरेखा यांनी बिचुकले यांची शाळा घेतली. ते कुठे चुकतात, शिवीगाळ करतात यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांना खडसावलं.


रुपालीनं माफी मागितली

आज नेहाला बिचुकले सुरेखा पुणेकरांबद्दल काही गोष्टी सांगणार आहेत. बिचुकलेंचं म्हणणे आहे की, सुरेखाताईना मी पहिल्यापासून ओळखतो. त्या वेगळ्याच मेंटलिटीमध्ये आहेत आणि आपला शो फ्लॉप करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये आहे. त्या माझ्यासमोर बोलल्या ते किंवा त्या मला उकसवत होत्या, कि यावर माझ्याकडून काही विधान घेऊन पुढे त्यांना ट्वीस्ट करायचं होतं मला माहिती नाही. तसंच काल झालेल्या प्रकारावरून रुपालीनं माफी मागितली आणि मी देखील माफी मागितली. हे होत असताना त्या तिथे होत्या आणि त्या म्हणाल्या ही पहिल्यापासून मला नको होती आणि नको आहे. बिचुकलेंच्या या म्हणण्यावर नेहा म्हणाली की, कोण नको आहे? त्यावर बिचुकले म्हणाले की, तू नको आहेस त्यांना. यावर नेहा विश्वास ठेवते का ते पहायचं आहे.हेही वाचा -

नीलनं व्हील चेअरवर पूर्ण केला 'बायपास रोड'चा प्रवास!

'गल्‍ली लाइफ' सांगणार लोकप्रिय भारतीय रॅपर्सची कथा
संबंधित विषय
Advertisement