Advertisement

'बिग बॉस २' मधील पहिलं नॅामिनेशन

'बिग बॉस'मध्ये बऱ्याच टास्क असतात, पण त्यापैकी खूप महत्त्वाची टास्क असते ती नॅामिनेशनची... 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वातील पहिली नॅामिनेशन प्रक्रिया आज पार पडणार आहे.

'बिग बॉस २' मधील पहिलं नॅामिनेशन
SHARES

'बिग बॉस'मध्ये बऱ्याच टास्क असतात, पण त्यापैकी खूप महत्त्वाची टास्क असते ती नॅामिनेशनची... 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वातील पहिली नॅामिनेशन प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे.


सहमतीनं अपात्र सदस्य

आजही 'बिग बॉस' मराठीच्या घरामध्ये बऱ्याच विषयांवर चर्चा रंगताना आणि वाद होताना दिसणार आहेत. सोमवारच्या भागामध्ये सदस्यांनी सहमतानं चार अपात्र सदस्यांची नावं 'बिग बॉस'ना सांगितली. ज्यामध्ये अभिजित बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली माडे आणि शिव ठाकरे यांचा समावेश होता. या प्रक्रियेमध्ये 'बिग बॉस' यांनी चारही सदस्यांना अॅक्टिव्हीटी एरियामध्ये बोलावलं. शिवनं त्याच्यासमोर ठेवलेला लखोटा उघडला. 


नेहा शितोळेबद्दल चर्चा 

शिवनं उघडलेल्या लखोट्यामध्ये 'नॉमिनेटेड' असं लिहिलं होतं. त्यामुळं घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये शिव थेट नॉमिनेट झाला, तर मैथिलीच्या लखोट्यामध्ये काहीही लिहिलेलं नसल्यानं ती 'बिग बॉस'च्या घरामध्ये राहण्यास पात्र ठरली. तर वैशाली आणि अभिजित यांना नशिबानं साथ दिली कि नाही हे आजच्या भागामध्ये पहायला मिळणार आहे. आजच्या भागामध्ये घरातील काही सदस्य अभिजित बिचुकलेबद्दल बोलताना दिसणार आहेत. तर पराग आणि विणा यांच्यामध्ये नेहा शितोळेबद्दल चर्चा रंगणार आहे. 


टास्क घोषित

दुसरीकडे शिवानी नेहाला अभिजित बिचुकले आणि रुपाली भोसले यांच्यामध्ये झालेला किस्सा सविस्तर सांगणार आहे. माधव देवचक्के आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये मोठी चर्चा रंगणार आहे. तर दुसरीकडे बिग बॉस नॉमिनेशन प्रक्रियायेसाठी एक टास्क घोषित करणार आहेत. ज्यामध्ये टीम अभिजित बिचुकले आणि वैशाली माडे या टीम मध्ये सिझन २ चा पहिला नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. पहिल्या नॅामिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्य कुणाला सुरक्षित करणार ते आज पहायला मिळेल.



हेही वाचा -

वेब सिरीजवर आधारलेल्या 'संतुर्की'चा ट्रेलर प्रदर्शित

‘सैराट’फेम रिंकूला बारावीत ८२ टक्के




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा