Advertisement

विवाहबंधनात अडकणार अक्षय आणि अमृता!

महाराष्ट्राचे तमाम प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होते तो क्षण आता आला आहे. अमृता आणि अक्षय लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत.

विवाहबंधनात अडकणार अक्षय आणि अमृता!
SHARES

महाराष्ट्राचे तमाम प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होते तो क्षण आता आला आहे. अमृता आणि अक्षय लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत.

छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या ‘घाडगे & सून’ या मालिकेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेचं कथानक आता एका नाट्यमय आणि कथानकातील महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचं आहे. अक्षयनं कियाराला घटस्फोट दिला असून, अमृताकडे एक शेवटची संधी मागितली आहे. अमृतानं ती संधी अक्षयला दिली आहे. माईबरोबरच घरातील इतरांही अक्षय आणि अमृतच्या लग्नास संमती दिली आहे. त्यामुळं आता त्यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडणार आहे. या सर्व घटनांमधील सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये अक्षयच्या मागं अमृता खंबीरपणे उभी होती.

अक्षयच्या प्रत्येक निर्णयात अमृतानं त्याला पाठिंबा दिला, अक्षयला अमृताची मिळालेली ही साथ आता अशीच कायम रहाणार आहे. आता खऱ्या अर्थानं अक्षयला अमृताची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे. अमृता यावेळी कोणताही संकोच मनामध्ये न बाळगता घाडगेंची सून म्हणून माप ओलांडणार आहे. पण, हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडेल? की मनोहर या सुखाच्या क्षणांमध्ये मिठाचा खडा टाकेल, हे लवकरच कळेल. घाडगे सदनमध्ये अमृतासोबतच अजून एक गृहप्रवेश होणार आहे. आता हा गृह प्रवेश कोणाचा होणार आहे? ती व्यक्ति कोण आहे? तिच्या घाडगे सदनामध्ये येण्यानं अक्षय आणि अमृताच्या आयुष्याला कुठलं नवं वळण मिळेल?

या मालिकेत आता अनंतची बायको म्हणून घाडगे सदनमध्ये चित्राही गृहप्रवेश होणार आहे. चित्राची भूमिका सोनल पवार साकारणार आहे. त्यामुळं ‘घाडगे & सून’ घाडगे सदनमध्ये काय घडणार हे या मालिकेत पहायला मिळणार आहे. अक्षय आणि अमृता या आपल्या आवडत्या कलाकारांचा आनस्क्रीन संसार सुखाचा होतो का ते देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
हेही वाचा -

'सॅक्रेड गेम्स'च्या कलाकारांना डिजीटल विश्वात सर्वाधिक पसंती

गणपती-गौरीसोबतचा 'पवित्र रिश्ता'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा