Advertisement

‘जागते रहो’ म्हणत मराठी सिनेसृष्टी पेटवणार देशभक्तीची ज्योत

दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठाच्या सहविद्यमानं प्रणाम भारत कला अभियानची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमाचं नाव ‘जागते रहो’ असं आहे. काही मराठी कलाकार आपापल्या परीनं सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कटिबद्ध राहून बिनबोभाटपणं आपलं कार्य करीत आहेत, पण ‘जागते रहो’च्या निमित्तानं प्रथमच मराठीतील बरेच कलाकार-तंत्रज्ञ-निर्माते एकत्र आले आहेत.

‘जागते रहो’ म्हणत मराठी सिनेसृष्टी पेटवणार देशभक्तीची ज्योत
SHARES
Advertisement

पुलवामामध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची केवळ देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून निंदा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण भारतात देशभक्तीची लाटच आली. ही देशभक्तीची लाट ओसरू न देता देशभक्तीची ही ज्योत मनामनांत प्रज्ज्वलीत ठेवण्याकरीता मराठी सिनेसृष्टीनं एक नवं पाऊल उचललं आहे. ‘जागते रहो’ या अनोख्या कार्यक्रमाअंतर्गत विशेषत: तरुणाईच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचं शिवधनुष्य मराठी सिनेसृष्टीनं उचललं आहे.


नेशन फर्स्ट

दूर व मुक्त अध्ययन संस्था, मुंबई विद्यापीठाच्या सहविद्यमानं प्रणाम भारत कला अभियानची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमाचं नाव ‘जागते रहो’ असं आहे. काही मराठी कलाकार आपापल्या परीनं सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कटिबद्ध राहून बिनबोभाटपणं आपलं कार्य करीत आहेत, पण ‘जागते रहो’च्या निमित्तानं प्रथमच मराठीतील बरेच कलाकार-तंत्रज्ञ-निर्माते एकत्र आले आहेत. भारतीय सैन्यदलानं दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला मानवंदना देण्यासाठी व तरुणाईच्या मनात नेशन फर्स्ट म्हणजे नेमकं काय आणि कसं याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.


राष्ट्रभक्तीची भावना 

यात पद्मश्री वामन केंद्रे, पुरुषोत्तम बेर्डे, प्रमोद पवार, अनंत पणशीकर, जयेंद्र साळगावकर, अभिराम भडकमकर, ऱाजन भिसे, संजय पेठे, प्रसाद महाडकर, चंद्रशेखर सांडवे, अमोल देशमुख, कुणाल रेगे आदी कलाकारांचा प्रामुख्यानं समावेश आहे. यासंबंधीची माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की, हा कार्यक्रम तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आहे. आपल्या देशाच्या रक्षणाची जबाबदारी केवळ सीमेवर लढणाऱ्या सैनिकांकडेच नसून, ते कर्तव्य आपणही पार पाडण्याची गरज असल्याची जाणीव करून देण्यासाठी आहे. हा प्रत्येकाला अलर्ट करण्याचा आमचा एक प्रयत्न असेल.


देशभक्तीच्या विचारांनी भारलेला

नाट्यनिर्माते अनंत पणशीकर यांनीही याप्रसंगी आपले विचार प्रगट केले. ते म्हणाले की, हा कोणताही ग्लॅमरस इव्हेन्ट नाही. हा पडद्यावरील हिरोंचा कार्यक्रम नसून, रिअल लाईफमधील हिरोंचा आहे. त्यामुळं हा मनोरंजनपर कार्यक्रम नाही, तर पूर्णत: देशभक्तीच्या विचारांनी भारलेला असेल. याच कारणामुळं याचं नाव ‘जागते रहो’ असं ठेवण्यात आलं आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला आपल्या स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होईल. यात मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न करण्यात येईल.


२८ मार्चला आयोजन

लेखक अभिराम भडकमकर यांच्या म्हणण्यानुसार समाजातील प्रत्येक घटकानं राष्ट्रभक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हायला हवं. भारतीय सैन्यदलाला मानवंदना देणारा ‘जागते रहो’ हा कार्यक्रम गुरुवार २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सांताक्रूझ येथील कलिनामधील मुंबई विद्यापीठातील मराठी भाषा भवनमध्ये पार पडणार आहे. दीपक मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पुढे इतरही पाच विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागते रहो’चं आयोजन करण्याची योजना आखण्यात आल्याच्ही सांगण्यात आलं आहे.हेही वाचा - 

'वेडिंगचा शिनेमा'नं दिले ऑनलाइन गायक

रसिक दरबारी ‘स्वामी त्रैलोक्याचा’
संबंधित विषय
Advertisement