Advertisement

कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील जुलिया रॉबर्ट्‌स?

'बिग बॉस' मराठीच्या घरात वादविवाद, हेवेदावे, भांडणं आणि हाणामाऱ्या होत असल्या तरी काही गंमतीशीर गोष्टीही घडत आहेत. या घरात आता एक मराठमोळी जुलिया रॉबर्ट्‌स पहायला मिळणार आहे.

कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील जुलिया रॉबर्ट्‌स?
SHARES

'बिग बॉस' मराठीच्या घरात वादविवाद, हेवेदावे, भांडणं आणि हाणामाऱ्या होत असल्या तरी काही गंमतीशीर गोष्टीही घडत आहेत. या घरात आता एक मराठमोळी जुलिया रॉबर्ट्‌स पहायला मिळणार आहे.


जुलिया रॉबर्ट्‌स कॉम्पलिमेन्ट

'बिग बॉस' मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी इतर सदस्यांना वेगवेगळी नावं ठेवली आहेत. शाकाल म्हणजे पराग, बिल्डर म्हणजे शिव आणि बरचं काही... 'बिग बॉस' मराठीच्या घरात पराग रुपालीला जुलिया रॉबर्ट्‌स म्हणाला. अभिजीत बिचुकले आणि पराग गप्पा मारत असताना रुपाली तिथे आली आणि ती म्हणाली की, आज तू मला काही बोलला नाहीस. मी वाट बघत होते. हे ती इंग्लीशमध्ये बोलल्यानं बिचुकलेंना समजलं नाही, तर पराग त्यावर म्हणाला की, मी तिला रोज कशी दिसते आहे हे सांगतो. याच संभाषणामध्ये पुढं परागनं रुपालीला जुलिया रॉबर्ट्‌स अशी कॉम्पलिमेन्ट दिली.


चर्चेला उधाण

सध्या पराग आणि रुपालीबद्दल 'बिग बॉस' मराठीच्या घरामध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे याबद्दलची चर्चा सदस्यांमध्ये आहे. गोव्याविषयी चर्चा सुरू असताना गंमतीमध्ये शिवसमोर परागनं रुपालीला त्याच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. तो म्हणाला की, आई बाबांना घेऊन ये. मुदिखाई कर लेंगे, पोहे मी करेन. त्यावर शिवनं विचारलं की, फायनल झालं का? शिवचं हे बोलणं एकून पराग म्हणाला की, मी तिच्या मागे लागलो आहे, पण ती होकार देत नाही. अशा काही गंमतीशीर गोष्टी घरात घडत आहेत. 


खूप मोठे बदल

किशोरी शहाणेंसमोर त्याचं रुपालीद्दल बोलणं हे सगळंच या गोष्टीकडं इशारा करतं. आता या दोघांच्या मनामध्ये खरंच असं काही आहे कि नाही हे त्यांनाच ठाऊक. अशातच बिचुकले यांनी आज शिवानीसाठी 'तुमसे मिलना, बाते करना...' हे गाण म्हटलं आहे. या गाण्यावरून एखादं वादंग उठलं नाही म्हणजे मिळवलं. तसं पाहिलं तर आता बिचुकले 'बिग बॅास'च्या घरात चांगलेच रुळले असून, घरातील सदस्यही त्यांना लाईटली घेऊ लागले आहेत. त्यामुळे १३ दिवसांमध्ये या घरात खूप मोठे बदल झाल्याचं पहायला मिळत आहे.



हेही वाचा -

मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी

एसी लोकलसाठी उभारणार २ नवे रेल्वे कारशेड, रेल्वे अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा