Advertisement

मयूरी देशमुखचा 'डबल धमाका'

लेखनाची आवड असलेल्या अभिनेत्री मयूरी देशमुखने नुकतेच दुहेरी पुरस्कार पटकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मयूरी देशमुखचा 'डबल धमाका'
SHARES

काही कलावंतांकडे अभिनयासोबतच इतरही कला असतात. बऱ्याच कलाकारांना लेखन-दिग्दर्शन करण्याचाही छंद असतो. अशीच लेखनाची आवड असलेल्या अभिनेत्री मयूरी देशमुखने नुकतेच दुहेरी पुरस्कार पटकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


'डिअर आजो' नाटकाचे लेखन

मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये उत्तम रुळलेल्या मयूरीनं 'डिअर आजो' या नाटकासाठी अभिनयासोबतच लेखनासाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. 'डिअर आजो' हे नाटक आजोबा आणि नात यांच्यातील गोंडस तरीही संवेदनशील नात्यावर भाष्य करणारं नाटक आहे. हेमंत आपटे निर्मित, अजित भुरे दिग्दर्शित या नाटकात मयुरी देशमुख आणि संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनयाखेरीज मयूरीने या नाटकाचं लेखनही केलं आहे.


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व लेखिका पुरस्कार

परिपक्व संहिता असलेल्या या नाटकानं प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच, याव्यतिरिक्त ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला 'माझा पुरस्कार'ही पटकावला आहे. या नाटकासाठी मयूरीला 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' आणि 'सर्वोत्कृष्ट लेखिका' या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. याशिवाय 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कारासाठी नाटकातील स्त्री विभागात मयूरीला नामांकन मिळालं आहे.


पाच वर्षांपूर्वी लेखन

थिएटर आर्ट्समध्ये मास्टर्स केलेल्या मयूरीनं हे नाटक जवळजवळ पाच वर्षांपूर्वी लिहिलं होतं. तिनं लिहिलेली संहिता नाट्यसृष्टीतील बऱ्याच दिग्गजांना आवडली. इतक्या लहान वयात केलेल्या तिच्या प्रगल्भ लेखनाचं कौतुकही सर्वांनी केलं. अजित भुरे यांना ही कथा तेव्हाच भावल्यानं, त्यांनी या नाटकाचं दिग्दर्शन कारण्याचं ठरवलं आणि 'डिअर आजो' प्रेक्षकांच्या भेटीला आलं.


हौस म्हणून लेखन

अभिनय हे मयूरीचं पहिले प्रेम आहेच; परंतु हौस म्हणून ती लेखनही करते. लेखनाच्या आपल्या आवडीबद्दल मयूरी म्हणाली की, मी थिएटर आर्ट्सला असताना शफाअत खान आम्हाला नाट्यलेखन शिकवायचे. त्यावेळी नाट्यलेखन मला खूप आव्हानात्मक वाटलं म्हणून मी लिखाणाला सुरुवात केली. माझ्या लिखाणाला अजित भुरे आणि संजय मोने अशा दिग्गजांकडून दाद मिळाली. मुळात माझ्या वयाकडं बघून अनेकांना विश्वास बसत नाही, की हिने काही प्रगल्भ लिहिलं असेल. अजित भुरे आणि संजय मोने यांनी विश्वास दाखवत माझी कथा प्रेक्षकांसमोर आणली. त्यामुळे या पुरस्कारांचं श्रेय त्यांनाही तितकंच जातं.



हेही वाचा -

जलवा दिव्याच्या सौंदर्याचा!

Movie Review : गोपाळरावांची जिद्द अन् आनंदीबाईंचा ध्यास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा