Advertisement

बिग बॉसच्या सदस्यांना कोण म्हणतंय कार्टी?

टास्क आणि नॅामिनेशनच्या फेऱ्यात अडकलेल्या या घरात एखादी बाहेरील व्यक्ती येते आणि सदस्यांना आश्चर्याचा धक्का देऊन जाते. आता या घरात अशी एक व्यक्ती येणार आहे, जी सदस्यांना कार्टी म्हणणार आहे.

बिग बॉसच्या सदस्यांना कोण म्हणतंय कार्टी?
SHARES

बिग बॉसचं घर जसं वादविवादाचा जणू कट्टा आहे, तसंच ते आश्चर्याचे धक्के देणारं ठिकाणही बनलं आहे. टास्क आणि नॅामिनेशनच्या फेऱ्यात अडकलेल्या या घरात एखादी बाहेरील व्यक्ती येते आणि सदस्यांना आश्चर्याचा धक्का देऊन जाते. आता या घरात अशी एक व्यक्ती येणार आहे, जी सदस्यांना कार्टी म्हणणार आहे. 


 घरामध्ये सदस्यांचे नातेवाईक

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जेव्हा सदस्यांचे नातेवाईक येतात तेव्हा बरेच जण भावूक होतात. काही नातेवाईक सदस्यांना सल्ले देतात, काही आशीर्वाद, तर काही चक्क कान पडकत खोड्या न करण्यास सांगतात. आता अभिजीत बिचुकलेची आई बिग बॉसच्या घरात येणार आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या बिचुकलेनं आपल्या वक्तव्यांसोबतच गंमतीशीर विधानांमुळं घरातील सदस्यांचं मनोरंजन केलं आहे. चेक बाऊंस प्रकरणात पोलीस कोठडीतून सुटका झाल्यानंतर बिचुकले पुन्हा घरी परतला आहे. पुनरागमानंतर बिचुकले कशा प्रकारे हा खेळ खेळणार आहे ते पहायचं आहे.


बिग बॉसना झोप नाही

खरं तर पोलीस कोठडीत गेल्यानंतर बिचुकलेला पुन्हा बिग बॉसमध्ये एंट्री मिळणार नाही असंच बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, पण जे अपेक्षीत असतं तसं घडलं तर त्याला बिग बॉसचं घर कसं म्हणणार? काहींना मात्र बिचुकलेच्या पुनरागमनाची पूर्ण खात्री होती. झालंही अगदी तसंच आणि बिचुकलेची बिग बॉसमध्ये एंट्री झाली. आता बिचुकलेची आई घरी येऊन काय म्हणते ते पहायला मिळणार आहे. बिचुकलेच्या आईचं म्हणणं आहे की, तीन महिने सांभाळायचं, घरातील चार पोरं सांभाळायला जमत नाही. तुम्ही सगळी कार्टी घरातली, तुमच्यामुळं बिग बॉसना झोप लागत नाही. 


चांगलं वागण्याचा सल्ला 

बिचुकलेच्या आईचं म्हणणं ऐकून घरच्यांना हसू फुटलं. कुठंतरी त्यांना देखील हे पटलं असावं. बिचुकलेची आई म्हणाली की, मला सगळे आवडतात. आईला सगळी मुलं सारखी असतात. आईसाठी कोणतंही मूल वेगळं नसतं. बिचुकलेच्या आईनं सगळ्यांना चांगलं वागण्याचा सल्ला दिला. तुम्ही आता एक महिना आई वडिलांची मुलं नाही, तर बिग बॉसची मुलं आहात अशा पध्दतीनं वागण्यास सांगितलं. त्या पुढे सदस्यांशी बोलताना म्हणाल्या की, तुम्ही अल्लड मुलं आहात बिग बॉसना किती काळजी आहे तुमची, किती भांडता तुम्ही, त्यांना किती विचार असतील तुमचे. तुम्ही किती तर्‍हेची माणसं आहत इथे एकत्र. आई वडिलांपेक्षा जास्त त्रास आहे त्यांना तुमचा.हेही वाचा -

‘सुपर ३०’ महाराष्ट्रात झाला टॅक्स फ्री!

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी'
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा