शिवा-सिद्धीचा सत्यनारायणाच्या पूजेसाठी 'जीव झाला येडापिसा'

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरू झालेल्या 'जीव झाला वेडापिसा' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या मालिकेतील शिवा आणि सिद्धी सत्यनारायणाची महापूजा घालणार आहेत.

शिवा-सिद्धीचा सत्यनारायणाच्या पूजेसाठी 'जीव झाला येडापिसा'
SHARES

छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरू झालेल्या 'जीव झाला वेडापिसा' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या मालिकेतील शिवा आणि सिद्धी सत्यनारायणाची महापूजा घालणार आहेत.


मनाविरुध्द पूजा

कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये सिद्धी कुटुंबियांना निक्षून सांगते की, शिवासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार नाही, पण नंतर सिद्धी मनाविरुध्द जाऊन आत्याबाईना दिलेल्या शब्दाखातर वटपौर्णिमेची पूजा करायला तयार होते. ज्यामध्ये सिद्धीला अचानक चक्कर येते. शिवा तिला आधार देतो, तिला उचलून घेतो आणि फेरे पूर्ण करतो. शिवा आणि सिद्धीच्या नात्यामध्ये विश्वास, प्रेम नाही. दोघे एकमेकांना साथीदार म्हणून स्वीकारतील हे अवघडच. 


पूजा करण्याचा निश्चय 

सिद्धीच्या मनामध्ये शिवाच्या वडिलांबद्दल आदर, आपुलकी आहे आणि त्यांच्या म्हणण्यामुळेच ती आजही त्या घरामध्ये असल्याचंही ती घरच्यांना सांगते. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय यशवंत यांनी केला आहे. आपल्या मनातील इच्छा त्यांनी व्यक्त केली असून ते म्हणाले कि, शिवा आणि सिद्धीनं त्या पूजेला बसावं. आता मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धी जोडीनं पूजा करणार आहेत. नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर, पैंजण यामध्ये सिद्धीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसणार आहे. 


 कट कारस्थानं

सत्यनारायणाची पूजा व्यवस्थित पार पडत असताना मंगल आता कोणती खेळी खेळेल? सिद्धीचा अपमान करायला ती एकसुध्दा संधी सोडत नसल्यानं आनंदाच्या या क्षणातही ती मिठाचा खडा टाकणार हे नक्की. पण शिवा हे थांबवू शकेल का ? सिद्धी हा क्षण कसा सांभाळून घेईल ? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. शिवाच्या घरामध्ये लग्न होऊन आल्यापासून सोनीसोबत सिद्धीचं मैत्रीचं नातं तयार झालं आहे. सोनी आणि काकू घरामध्ये सिद्धीला प्रत्येक क्षणी मदत करतात आणि तिच्या पाठीशी उभ्या रहतात. यशवंत यांची खंबीर साथ असल्यानं मंगलची कट कारस्थानं अद्याप तरी पूर्ण झालेली नाहीत.हेही वाचा -

जॉनीसोबत भरत-निर्मिती करणार 'एक टप्पा आऊट'

पहा, अमिताभ यांचा अफलातून लुक!
संबंधित विषय