Advertisement

'बिग बॉस'ची शाळा सुटली, पाटी फुटली

'बिग बॉस' मराठीच्या घरातील सदस्यांना दर आठवड्याला एक टास्क दिला जातो. या आठवड्याचा टास्क काहीसा वेगळा आहे. याचं नाव आहे 'शाळा सुटली, पाटी फुटली'...

'बिग बॉस'ची शाळा सुटली, पाटी फुटली
SHARES

'बिग बॉस' मराठीच्या घरातील सदस्यांना दर आठवड्याला एक टास्क दिला जातो. या आठवड्याचा टास्क काहीसा वेगळा आहे. याचं नाव आहे 'शाळा सुटली, पाटी फुटली'...


विद्यार्थी, शिक्षकाच्या भूमिकेत 

जून महिना नुकताच सुरू झाला आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते. त्याच जुन्या आठवणींना आणि आपल्यात दडलेल्या लहान मुलाला, निरागसतेला उजाळा देण्यासाठी 'बिग बॉस' हे कार्य घरातील सदस्यांवर सोपवणार आहेत. ज्यामध्ये एका टीम मधील सदस्य विद्यार्थी, तर दुसऱ्या टीममधील सदस्य शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रत्येक शिक्षकाला नेमून दिलेला विषय त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिकवणं अपेक्षित आहे. ज्यामध्ये सुरेखा पुणेकर यांनी नृत्यकला, विणा जगतापनं वाद विवाद शास्त्र आणि शिवनं मराठी हे विषय विद्यार्थ्यांना शिकवायचे आहेत.


विद्यार्थ्यांच्या वेशामध्ये

'बिग बॉस' मराठीच्या घरामध्ये आज शाळा भरणार आहे. कारण 'बिग बॉस' यांनी सदस्यांवर शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य सोपवलं आहे. या टास्कदरम्यान सदस्य विद्यार्थ्यांच्या वेशामध्ये खूपच छान दिसत आहेत. या टास्क दरम्यान मज्जा तर होईलच पण त्यासोबत भांडण देखील बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये किशोरी शहाणे यांनी अभिजीत बिचुकले यांना त्यांचं नाव विचारताच माधव आणि बिचुकलेमधील मजेशीर संवाद बघायला मिळणार आहे.


शिव-नेहाचं भांडण

शाळेमध्ये लहान मुलं खोड्या काढणारच. नेहाला टास्कमध्ये कान पकडून उभ राहण्याची शिक्षा मिळाली आहे. पण ती शिक्षा सोडून मस्ती करत असताना शिवला दिसली आणि शिवनं तिला खडू फेकून मारला. यावर शिवनं हिंसा केल्याची तक्रार नेहानं 'बिग बॉस'कडं केली. इथे शारीरिक हिंसा चालली आहे. यावर शिवनं देखील उत्तर दिलं कि, आता जर हिनं गुन्हा केला, तर हिला शाळेतून बाहेर काढावं लागेल. त्यानंतर शब्दाला शब्द वाढत गेला. घराचे संस्कार जर नीट असले तर मुल चांगले राहतात असं शिवनं नेहाला म्हटलं. यावर नेहानं आक्षेप घेतला कि, कोणालाही माझ्या घरच्या संस्कारांवर जाण्याचा अधिकार नाही. शिवनं माझी नाही माझ्या घरच्यांची माफी मागावी, ज्याला शिवनं नकार दिला. किशोरी शहाणे यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आता बघू हे भांडण किती विकोपाला जातं.हेही वाचा -

बालीनं पाहिला विद्याचा हॅाट अंदाज!

श्रद्धाचा 'साहो' अंदाज पाहिला का?संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा