बीएजेए स्पर्धेत मुंबई गटात सोमय्या प्रथम स्थानावर


  • बीएजेए स्पर्धेत मुंबई गटात सोमय्या प्रथम स्थानावर
SHARE

बीएजेए एसएई इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयीन स्पर्धेत मुंबई गटात विद्याविहारच्या के. जे सोमय्यातल्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान मिळवले. या स्पर्धेत सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी ऑल टिरेन व्हेईकल (एटीव्ही) युधान 1.0 ही कार तयार केली होती. या कारचे वजन 158 किलो इतके असून ती जलद गतीने धावू शकते. या विद्यालयातल्या 'रेडशिफ्ट रेसिंग इंडिया' या 37 सदस्यांच्या पथकाने युधान 1.0 नावाची कार बनवली आहे.

या कारचं वजन कमी असावं यासाठी अॅल्युमिनिअम रिब्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच कारच्या गियर बॉक्सचे डिझाईन कार्बन फायबर आऊटर केसिंगचा वापर करून बनवले आहे. बर्फाच्छादित, डोंगराळ भाग, शेत जमीन आणि लष्करी भाग या सर्व ठिकाणच्या जमिनींवर ही कार चालू शकते. ही कार तयार करण्यासाठी एकूण 3 लाख 28 हजार रुपये खर्च आला आहे.

गेल्या एक वर्षापासून ऑल टिरेन व्हेईकल (एटीव्ही) युधान 1.0 ही कार बनवण्याची तयारी करत होता. या स्पर्धेत रेड शिफ्ट रेसिंग इंडिया पथकाने बीएजेए एसएई इंडिया स्पर्धेत मुंबईत प्रथम स्थान मिळवले असून देशात 11वे स्थान मिळाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. तसेच आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेची तयारी करत आहोत. 

आदित्य पुरोहित, लीडर, रेड शिफ्ट रेसिंग इंडिया

संबंधित विषय
ताज्या बातम्या