प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन सोहळा

  wadala
  प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन सोहळा
  मुंबई  -  

  वडाळा - प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिराचा 400 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त 1 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत विठ्ठल मंदिर ट्रस्टतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. 400 वर्ष जुने असलेल्या या विठ्ठल मंदिराचा इतिहास हा संत तुकाराम महाराजांच्या काळापासून आहे. 

  पंढरपूरवरून आणलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीची स्थापना ही वडाळा येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आली. त्यामुळे त्याला प्रतिपंढरपूर असे नाव देण्यात आले. या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी हे सण अगदी मोठ्या उत्साहात साजरे करतात. तर, यंदाच्या या 400 व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरातर्फे मोफत आरोग्य शिबीर, आनंद मेळावा, नाटक, हळदीकुंकू, पाककला स्पर्धा, भजन, पालखी, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले असून 9 दिवस हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.