Advertisement

विठ्ठल मंदिराच्या 400 व्या वर्धापनदिनाचा समारोप


विठ्ठल मंदिराच्या 400 व्या वर्धापनदिनाचा समारोप
SHARES

प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिराचा 400 वा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्त 2 ते 9 एप्रिलपर्यंत भजन, पाककला, भक्ती गीते, आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

9 तारखेला सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी विभागातून भजन आणि संध्याकाळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.

400 वर्षांचा संतांचा इतिहास असलेल्या या प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिराची पालखी ही काहीशी संस्कृतीचे दर्शन घडवणारी होती. विभागातील महिला, पुरुष आणि तरुण मंडळी या पालखीत उत्साहाने सहभागी झाले होते. तर, आठवडाभर सुरू असलेल्या या कार्यक्रमांची धूम ही वडाळा विभागात सर्वत्रच दिसून आली. विभागातील नागरिकांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग दाखवल्याचे कार्यक्रमाचे आयोजक बजरंग देशमुख यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा