साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाच्या आयोजनासाठी बैठक

 Prabhadevi
साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाच्या आयोजनासाठी बैठक
साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाच्या आयोजनासाठी बैठक
साईबाबा महासमाधी शताब्दी वर्ष संमेलनाच्या आयोजनासाठी बैठक
See all

प्रभादेवी - साईबाबा महासमाधी शताब्दी वर्षाच्या दुसऱ्या संमेलनाच्या पूर्व तयारीची बैठक रविवारी घेण्यात आली. या बैठकीला मुंबईतील साईभक्त उपस्थित होते. 99 व्या साईबाबा महासमाधी शताब्दी वर्षाचे दुसरे संमेलन 14 आणि 15 ऑक्टोबर 2017 ला होणार असल्याची माहिती साईभक्त सच्चिदानंद आप्पा यांनी दिली. या बैठकीदरम्यान गतवेळीच्या साईभक्त संमेलनातील राहिलेल्या त्रुटींवर देखील चर्चा झाली.

ऑक्टोबर 2017 ला होणाऱ्या या संमेलनाची जागा निश्चित झालेली नाही. यासाठी रामनवमीनंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळचे साईभक्त संमेलन मुंबई शहरात की उपनगरात होणार हे निश्चित नसल्यामुळे विलंब होत असल्याचे साईभक्त सच्चिदानंद आप्पा यांनी सांगितले. हजारोंच्या संख्येने गतवर्षी साईभक्त उपस्थित राहिले होते, यंदाही देशभरातील साईभक्त उपस्थिती दर्शवतील अशी आयोजकांची खात्री आहे.

Loading Comments