वरळीत भ्रष्टाचाराची होळी

 BDD Chawl
वरळीत भ्रष्टाचाराची होळी

वरळी - सालाबादप्रमाणे यंदाही वरळी बीडीडी चाळमध्ये समाजातील भ्रष्टाचाराविरुद्ध होळी तयार करण्यात अाली आहे. यंदा काळे धन, नोटबंदीचा लोकांना बसलेला फटका यावर ही होळी साकारण्यात अाली आहे .

तब्बल 54 फुटांची ही होळी चंद्रकांत अवघडे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने साकारली आहे. गेली 50 वर्ष या ठिकाणी होळीतून सामाजिक संदेश दिला जातो. टाकाऊ पदार्थांपासून ही होळी तयार करण्यात येते. 78 आणि 79 क्रमांकाच्या बीडीडीची ही होळी असून वीर नेताजी क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते यात सहभागी आहेत. गेल्या वर्षी या मंडळाने विजय मल्ल्याचा पुतळा होळीच्या स्वरुपात उभा केला होता. त्याची दखल गतवर्षी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली होती.

Loading Comments