शोभायात्रेत दिला वृक्षारोपणाचा संदेश

 Prabhadevi
शोभायात्रेत दिला वृक्षारोपणाचा संदेश
शोभायात्रेत दिला वृक्षारोपणाचा संदेश
See all

प्रभादेवी - 'आम्ही प्रभादेवीकर' ग्रुपच्या वतीने प्रभादेवीत गुढीपाडवा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभा यात्रेमध्ये लहान मुलांनी पारंपारिक पोशाख करुन झाडे लावा-झाडे जगवा, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देऊ नका, स्त्री भृण हत्या थांबवा असे सामाजिक संदेश दिले. त्याचबरोबर या शोभा यात्रेत ढोल ताशे यांच्यासह लेझीम पथके सहभागी झाली होती.

सेंच्युरी बाजार, गणेश वाडी, न्यू प्रभादेवी रोड, किस्मत सिनेमा, वीर सावरकर रोड, सिद्धिविनायक मंदिर, खेडगल्ली दत्तू बांदेकर चौक आणि पुन्हा राजाभाऊ साळवी उद्यानाकडे या शोभा यात्रेची सांगता झाली. यंदा या शोभा यात्रेत नवनवीन प्रकल्प तयार करण्यासाठी शहरात वृक्षांची कत्तल केली जात आहे. ती रोखण्यासाठी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले.

Loading Comments