नियम मोडणाऱ्या १३७ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई

गतवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीवेळी ध्वनी नियंत्रणाबाबतचे नियम मोडणाऱ्या सुमारे १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नियम मोडणाऱ्या १३७ गणेशोत्सव मंडळांवर कारवाई
SHARES

मुंबईत गणेशोत्सवादरम्यान (Ganesh Utsav 2019) बाप्पाच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी (Ganesh visarjan) DJ लावण्यात येतो. मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं (Ganpati Bappa) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आगमन करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून बाप्पाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीवेळी DJवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं बाप्पाच्या मिरवणुकीवेळी DJ लावल्यास संबंधित मंडळावर (Mandal) कारवाई करण्यात येते. यांसारख्या अनेक मंडळांवर मागील काही वर्षात कारवाई करण्यात आली आहे.

गतवर्षी बाप्पाच्या मिरवणुकीवेळी ध्वनी नियंत्रणाबाबतचे (Noise Pollution) नियम मोडणाऱ्या सुमारे १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर (Sarvajanik Ganeshotsav Mandal) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तसंच, या मंडळांच्या सभासदांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांवरील राजकीय गुन्ह्यांप्रमाणंच सामाजिक बांधिलकी जपून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांवरील खटले मागे घ्यावे, असं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं (Sarvajanik Ganesh Festival Coordinating Committee) राज्य सरकारला (State Government) साकडं घातलं आहे.

मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १२ हजाराच्या घरात पोहोचली आहे. गणेशोत्सवातील कार्यक्रमांसाठी रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येत होता. तसंच रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाद्य आणि ध्वनीक्षेपकांचा वापर होत होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयानं रात्री १० नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई केली आहे.

असं असतानाही गेल्या वर्षी रात्री १० नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करणाऱ्या, तसेच ध्वनीच्या मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी सुमारे १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.

कारवाई झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये या संदर्भात नोटीस धाडण्यात येते. त्यामुळं त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य खच्ची होते, अशी खंत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर (Sarvajanik Ganesh Festival Coordinating Committee Chief Naresh Dahibavkar) यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपून मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते विविध उपक्रम राबवित असतात. पदाधिकारी-कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले खटले जलदगतीनं न्यायालयाच्या माध्यमातून निकाली काढण्याचं आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांविरुद्धचे खटले मागे घेण्यासंदर्भात शासकीय आदेश काढण्यात आला होता. त्याच धर्तीवर गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.हेही वाचा -


संबंधित विषय