अय्यप्पा पूजा उत्सवाची धूम

 Pratiksha Nagar
अय्यप्पा पूजा उत्सवाची धूम
अय्यप्पा पूजा उत्सवाची धूम
अय्यप्पा पूजा उत्सवाची धूम
अय्यप्पा पूजा उत्सवाची धूम
See all

सायन कोळीवाडा - सायन कोळीवाडा येथे अय्यप्पा पूजेच्या उत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झालीय. 2 ते 4 डिसेंबरला सकाळी साडेचार ते साडेदहा वाजेपर्यंत अय्यप्पा पूजा उत्सव जय शंकर याग्निक मार्ग, सरदार नगर येथे आयोजित करण्यात आलाय. अय्यप्पा मंडळ उत्सवाचे यंदाचे २९ वे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मंडळातर्फे करण्यात आलंय. या उत्सवात पूजा, पाठ, होम, हवन, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आणि भक्तीगीतांचा समावेश आहे. तसेच उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पारंपरिक  प्रसादाचं वाटप केलं जाईल. 'हा उत्सव दरवर्षी साजरा केला जात असून, इथं ३ दिवस पूर्ण भक्तिमय वातावरण असतं,' असं मंडळाचे सभासद के.एन.मणी यांनी सांगितलं.

Loading Comments