Advertisement

तरूणानं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची मोजेक पोर्टेट

अंधेरीतील तरूणानं छत्रपती शिवाजी महाराजांची मोजेक पोर्टेट साकारून वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडियामध्ये विक्रम नोंदवला आहे...

तरूणानं साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची मोजेक पोर्टेट
SHARES

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्तानं त्यांचे मोजेक पोर्टेट बनवण्यात आले आहे. हे पोर्टेट नितीन दिनेश कांबळे या कलाकारनं तयार केलं आहे. नितीननुसार त्यानं १० दिवसात १० फूट लांब आणि ८ फूट रुंद चित्र तयार केलं आहे. हे चित्र तयार करण्यासाठी त्यानं ६ विविध रंगाच्या ४६ हजार प्लास्टिक तुकड्यांचा वापर केला आहे.

नितीन कांबळेनी सांगितलं की, हे पोर्टेट बनवण्यासाठी ४६ हजार ०८० प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर केला आहे. भारतात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे. मात्र आपण याची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकलेलो नाही. कारण प्लास्टिक आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहे. पर्यावरणाप्रती जागृक करण्यासाठीच हे पोर्टेट बनवल्याचं त्यानं सांगितलं.

वर्ल्ड रिकॉर्ड्स इंडियामध्ये हा विक्रम नोंदवण्यात आला आहे. यावर नितीन म्हणाला की, हा माझा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मला स्वातंत्र्य सैनिकांसाठी पुढे काम करायचे आहे. युवा पिढींनं त्यांच्याबद्दल जाणून घ्याव आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा