Advertisement

चिंचपोकळीच्या चिंतामणी धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी

कोरोना विरोधी लढ्यासाठी मुंबईतील लालबाग येथील चिंचपोकळीच्या चिंतामणीनं पुढाकार घेतला आहे.

चिंचपोकळीच्या चिंतामणी धावला कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी
SHARES

कोरोना विरोधी लढ्यासाठी मुंबईतील लालबाग येथील चिंचपोकळीच्या चिंतामणीनं पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाख ५१ हजार रुपयांची मदत केली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ गेली १०० वर्षे विविध उपक्रम राबवित आहे. या मंडळानं सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला-क्रीडा या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यानुसार, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ व मंडळामार्फत जमा झालेली ३ लाख ५१ हजार रूपये 'मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड १९' या निधीसाठी धनादेशाद्वारे संबधित खात्यात जमा करण्यात आले आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून मंडळाच्या वतीने करोना या विषाणूबाबतची माहिती व घ्यावयाची काळजी या संबधीचे माहिती पत्रक सोबत डेटॉल साबण व सॅनिटायझरचं वाटप चिंचपोकळी परिसरातील इमारतींमध्ये मार्च महिन्यात घरोघरी करण्यात आलं. 

महाराष्ट्रात कोणतंही संकट आल्यास चिंचपोकळीचा चिंतामणी धावून जातो. गतवर्षी पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीमुळं आलेल्या संकटावर मात करण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी उपलब्ध करून दिला होता. या भयावह परिस्थितीवर आपण सर्वांच्या मदतीने नक्कीच मात करण्याचा आशावाद मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा