अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव

  Dadar
  अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या दागिन्यांचा लिलाव
  मुंबई  -  

  मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणपतीच्या दागिन्यांचा अक्षय्य तृतीयेला लिलाव करण्यात येणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला अनेकजण सोन्याची खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेचं औचित्य साधून वर्षभर गणपती बाप्पाला नवसाचे आणि दान म्हणून आलेल्या दागिन्यांचा लिलाव 28 एप्रिल रोजी सिद्धिविनायक गणेश मंदिरात आयोजित केला आहे. या लिलावामध्ये बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या विविध आकारातील सोन्याच्या अंगठ्या, प्रतिमा, लॉकेट, दुर्वा, सोन्याच्या साखळ्या, हार आदींचा समावेश आहे. 28 एप्रिलला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हे दागिने लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यास समितीने राखून ठेवलेले असून, सर्व भक्तांनी या लिलावात सहभागी व्हावे, असे न्यास व्यवस्थापन समितीने आवाहन केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.