SHARE

गणेशोत्सवासाठी मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन कोकणात जाणा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या वाहनांना टोलसवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी खास स्टिकर्स देण्यात येतील. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचा गणेश चतुर्थीचा सण कोकणात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. चतुर्थीसाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे चाकरमान्यांवर यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी राज्य सरकारनं टोलकृपा केली आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या