छठपूजेसाठी बेस्ट तयार

 Pali Hill
छठपूजेसाठी बेस्ट तयार

मुंबई - जुहू बीच, गणेश घाट, पवई, गोराई खाडी या ठिकाणी 6 आणि 7 नोव्हेंबरला छट पुजा होणार आहे. छठपूजा साजरी करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने या दोन्ही दिवस जादा बेस्ट गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 6 नोव्हेंबरला दुपारी 16 आणि 7 नोव्हेंबरला सकाळी 6 जादा गाड्या सोडण्यात येतील. 203, 231, 253, 256 आणि 339 या क्रमांकाच्या या जादा गाड्या असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, त्यांना माहिती देण्यासाठी जुहू बीच, जुहू बसस्थानक, सांताक्रूझ बसस्थानक, पवई आणि गोराई खाडी येथे वाहतूक अधिकारी आणि बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचंही बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Loading Comments