राज्य रस्ते विकास महामंडळानं टोल सवलतीचा निर्णय घेतला. पण या निर्णयाच्या अंमलबजावणीत विघ्न येताहेत. आधी या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत आदेशच विभागाला उशीरा मिळाले. तर नंतर फक्त कोकणात जाण्यासाठीचेच पास उपलब्ध करण्यात आले. परतीच्या प्रवासात ही सवलत मिळणार नाही..टोलमाफीच्या निर्णयाचं श्रेय घेण्याच पुढाकार घेणारे नितेश राणे या गोंधळावर मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत.