Advertisement

मुंबईत ३७९ गणेशोत्सव मंडळांना महापालिकेनं परवानगी नाकारली

रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल ३७९ मंडळांना विविध कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे.

मुंबईत ३७९ गणेशोत्सव मंडळांना महापालिकेनं परवानगी नाकारली
SHARES

यंदाच्या गणेशोत्वासाठी महापालिकेनं अनेक मंडळांना परवानगी नाकारली आहे. रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल ३७९ मंडळांना विविध कारणांमुळं परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतील ३०६४ अर्जांपैकी २ हजार ५९८ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तसंच, ८७ मंडपाचे अर्ज प्रक्रियेत आहेत. वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या मंडपांनाच परवानगी देण्यात यावी असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळं रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पालिकेची परवानगी घेणं बंधनकारक आहे.

परवानगी नाकारली

वाहतुकीला अडथळा येत नसल्याचं प्रमाणपत्र पोलिसांनी व ट्रॅफिक पोलिसांनी दिल्यावरच पालिकेकडून परवानगी दिली जाते. यंदा अशा ३७९ मंडपांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मंडळांना परवानगी देण्यासाठी पालिकेनं गेल्या वर्षीपासून ऑनलाइन पद्धत आणली. मात्र अनेक मंडळं न्यायालयाचे निर्देश पाळत नसल्यामुळं त्यांना परवानगी मिळत नाही.

सध्याची मंडपांची स्थिती

  • पालिकेकडे आलेले एकूण अर्ज – ३७२७ 
  • दोनवेळा आलेले अर्ज – ६६३
  • छाननीसाठी आलेले अर्ज – ३०६४
  • परवानग्या दिल्या – २५९८
  • परवानग्या नाकारल्या – ३७९
  • अर्ज प्रक्रियेत – ८७हेही वाचा -

कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरे कॉलनीत वृक्षतोडीला विरोध

उरण ओएनजीसी प्लांटला भीषण आग, ७ जणांचा मृत्यूRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा