Advertisement

गणेशोत्सवाकरीता मूर्तिकारांना मंडपासाठी ऑफलाईन परवानगी


गणेशोत्सवाकरीता मूर्तिकारांना मंडपासाठी ऑफलाईन परवानगी
SHARES

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी मूर्ती तयार करुन विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना मंडप बांधण्यासाठी व त्यामध्ये मूर्तींची विक्री करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून यंदाही 'ऑफलाईन' पद्धतीने परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईबाहेरुन तयार मूर्ती आणून फक्त त्यांच्या विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. 

महापालिकेने मूर्तिकारांना मंडपाकरीता परवानगी देण्यासाठी सन २०२१ करीता लागू केलेले विविध स्तरीय शुल्काबाबतचे परिपत्रक पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच सदर परिपत्रक हे मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी //portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्व संबंधितांनी महापालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्‍यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदाही गणेशोत्सवावर काही निर्बंध घालण्यात आले आहे. गणेशोत्सवासंदर्भात नियमावली काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी महामंडळांनी महापालिका वा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा