Advertisement

मोहरम मिरवणुकीला हायकोर्टाची सर्शत परवानगी, पण 'हे' आहेत कडक निर्बंध

दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान या मिरवणुकीची परवानगी आहे.

मोहरम मिरवणुकीला हायकोर्टाची सर्शत परवानगी, पण 'हे' आहेत कडक निर्बंध
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी दिली आहे. केवळ लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस झालेल्या भाविकांनाच 'ताजिया' मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी असेल, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मात्र रस्त्यावरुन पायी मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सात ट्रकमधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी आहे. एका ट्रकवर केवळ १५ जणांनाच मुभा देण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान या मिरवणुकीची परवानगी आहे. यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळमर्यादा राहील. तसंच मिरवणुकीच्या शेवटी केवळ २५ जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी असेल, असंही हायकोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय.

मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईत येत्या शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी शिया मुस्लीम संघटनेला मोहरम निमित्तानं प्रतिकात्मक शोक मिरवणूक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. या ताजियात सामील होणाऱ्या प्रत्येकानं त्या विभागातील पोलीस उपायुक्तांकडे गुरूवारी दुपारीपर्यंत जमा करणं आवश्यक असल्याचं हायकोर्टानं आपल्या निर्देशांत स्पष्ट केलं आहे.

दक्षिण मुंबईत मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी करत ऑल इंडिया इदारा-ए-तहफुज-ए-हुसेनियात या संघटनेच्यावतीनं हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत मेहंदी, अल्लाम आणि ताजिया विधी करण्याची परवानगी मिळावी यासाठी या याचिकेतून मागणी केली होती.

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सध्या कमी झाल्यानं राज्य सरकारनं अनलॉकचे निर्बंध अधिक शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका ध्यानात ठेवूनच प्रत्येक धर्मियांनी यंदाच्यावर्षी आपले सण उत्सव साजरे करावेत असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलं. तसंच हे निर्देश याचिकाकर्त्यांना केवळ मुंबईपुरताच दिलेले आहेत.



हेही वाचा

'जाहिरातींमुळं गर्दी होऊ नये' सरकारच्या नियमावलीमुळं गणेशोत्सव मंडळांची होणार आर्थिक कोंडी?

यंदाही गणेशोत्सवात आरोग्यविषयक कार्यक्रमांवर भर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा