होळीसाठी ‘रंगली’ बाजारपेठ

दादर - होळी आणि धुळवडीसाठी विविध रंगांनी सध्या दादरची बाजारपेठ सजली आहे. तसंच बच्चे कंपनीच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे डोरेमॉन, अँग्री बर्ड हे सुद्धा पिचकरींच्या स्वरूपात मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्केटमध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर आणि कॅशलेसमुळे परिणाम झाला असल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या कार्टूनमध्ये उपलब्ध असल्यामुळे मुलांमध्ये वेगळाच आनंद दिसून येत असल्याचं पालकांनी सांगितलं.

Loading Comments