Advertisement

नायगावच्या शोभायात्रेत शिवकालीन खेळांचे दर्शन


नायगावच्या शोभायात्रेत शिवकालीन खेळांचे दर्शन
SHARES

नायगाव - रस्तोरस्ती संस्कार भारतीची रांगोळी, ढोल- ताशा, लेझीमचे ताल, मल्लखांब, शिवकालीन मर्दानी खेळ, डोक्यावर फेटा आणि पारंपरिक वेशभूषा अशा वैविध्यपूर्ण नटलेल्या मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन दादर पूर्व परिसरात शोभायात्रेतून घडविण्यात आले.

यात पाच हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. तर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका उर्मिला पांचाळ आदींनी लोकप्रतिनिधींनी या यात्रेत हजेरी लावली.

विशेष म्हणजे या यात्रेत स्त्री जन्माचे स्वागत करा, मुलगी शिकली प्रगती झाली, लैंगिक शोषण, बाल विवाह, हुंडा बळी आदी महिला अत्याचारांवर प्रतिबंध येण्याच्या उद्देशाने सामाजिक संदेश देण्यासाठी समाजात उच्च स्थान भूषविणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रतिमा या शोभायात्रेत ठेवण्यात आल्या होत्या. तसेच शिवरायांचे आरमारी जहाज, शरीराचा थरकाप उडविणारे मल्लखांब सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

यंदाचे या समितीचे हे दुसरे वर्ष असून दादर पूर्व येथून सुरु करण्यात आलेली शोभायात्रा दादासाहेब फाळके मार्ग, डॉ. आंबेडकर रोड, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, महात्मा फुले रोड, गोविंद केणी मार्ग ते भवानी माता मंदिर रोड येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा