Advertisement

दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला! सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षण

दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला! सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षण
SHARES

दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

यासंदर्भातील सरकारी आदेश देखील शिंदे-फडवणीस सरकारने काढला आहे. प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. या व्यतीरीक्त दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत देखील प्राधन्य दिले जाणार आहे.

सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे.

बुधावरी राज्याच्या क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती. आज या संबंधीत जीआर काढत या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. दहीहंडी खेळत असताना एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख तर गंभीर जखमी झाल्यास 7:50 लाख रुपये दिले जाणार आहेत. हात पाय जायबंदी झाल्यासा 5 लाखांची मदत केली जाणार आहे.

विम्यासंदर्भातील आदेश केवळ 2022 या वर्षीसाठी लागू असणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.

दहीहंडी संदर्भातील नियम

  • दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे.
  • न्यायालय, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे.
  • गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी.
  • पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे
  • मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही
  • गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.
  • मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.



हेही वाचा

लालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या

गोविंदांना सुरक्षेचं 'विमा' कवच; मनसेची चिलखत योजना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा