Advertisement

लालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या

यंदा लालबागचा राजा मंडळ अयोध्येतील राम मंदीराच्या थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे.

लालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या
SHARES

लालबागच्या राजा हा मुंबईसह देशविदेशातील करोडो गणेशभक्तांचे श्रध्दास्थान आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती या लालबागच्या राजाची आहे.

लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. यासह येथील देखावे देखील नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि एका थीम वर आधारीत असतात. यंदा लालबागचा राजा मंडळ अयोध्येतील राम मंदीराच्या थीमवर आधारीत देखावा साकारणार आहे.

यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती(Ram temple in Ayodhya ) साकारणार आहे.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई(Famous art director Nitin Chandrakant Desai) हे कलाकृती साकारत आहेत.

मंडळाच्या प्रवेशद्वारावरच राममंदीराची प्रतिकृती आणि प्रभु श्रीरामाची प्रतिमा असणार आहे. तर मुख्य मूर्तीच्या स्थापनेच्या ठिकाणी राममंदीराच्या घुमटची प्रतिकृती असणार आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्षात सर्व सणांवर निर्बंध होते. कोरोना काळात गणेश भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा सर्व सण व उत्सव धुमधडाक्यात साजरे करायचे असे निर्देश दिले आहेत.

कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा होत आहे. यामुळे तब्बल दोन वर्षानंतर भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन होणार आहे.



हेही वाचा

कोकणातील गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट दरात वाढ

गोविंदांना सुरक्षेचं 'विमा' कवच; मनसेची चिलखत योजना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा