Advertisement

दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज


दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज
SHARES

मुंबईसह उपनगरातील सर्व गोविंदा पथक हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ठिकठिकाणी बांधण्यात येत आहेत. शनिवारी सकाळपासून सुरू होणारा हा उत्सव रात्री उशिरापर्यंत उत्तरोत्तर रंगणार आहे. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव (Shri Krushna Janmashtami) सोहळा पार पडला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसंच, श्री कृष्णाची पूजा करत हंड्या फोडल्या. जगभरात मुंबईची दहीहंडी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे आयोजकांनी अनेक दहीहंडी रद्द केल्या आहेत. तसंच, या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई आणि ठाण्यातील अनेक आयोजकांनी हंड्या रद्द केल्या आहेत.

'या' दहीहंडी रद्द

  • घाटकोपरमधील भाजप आमदार राम कदमांची दहीहंडी.
  • बोरिवलीतील शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची दहीहंडी.
  • शिवसेना नेते सचिन अहिर यांची संकल्प दहीहंडी.
  • ठाण्यातल्या राजन विचारेंची आनंद दिघे चॅरिटेबल ट्रस्टची हंडी रद्द.
  • राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही गेल्यावर्षीपासून दहीहंडी रद्द केली आहे.
  • कालिदास कोळंबकर आयोजित हंडी. 
  • अरुण दुधवडकर यांचा एसी मार्केटमध्ये होणारा उत्सव.
  • गिरगावमध्ये पांडुरंग सकपाळ यांचा गोपाळकाला रद्द.
  • ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी रद्द.

'या' ठिकाणी बांधणार दहिहंडी

  • दादरच्या आयडियलची दहीहंडी
  • दहिसरमधली संस्कार प्रतिष्ठानची दहीहंडी
  • अंधेरीत मनसेच्या सचिन धुरींची दहीहंडी
  • प्रभादेवीत मनसेची दहीहंडी 
  • ठाण्यातली स्वामी प्रतिष्ठान
  • शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांची संस्कृती प्रतिष्ठान 

३,३३० गोविंदा पथक

मुंबईच्या शहर आणि उपनगरात सुमारे ३,३३० गोविंदा मंडळांची नोंद झालेली आहे. दहीहंडी उत्सवाला गालबोट लागू नये, म्हणून मुंबईत ४० हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. उत्सवासाठी उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी, नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देत, गोविंदांना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. साध्या गणवेशातील पोलीस गर्दीत सहभागी होत सर्व स्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. यासाठी पोलिसांना शहरातील पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवरची मदत होणार आहे. मुंबई पोलीस दलातील ४० हजार अधिकारी आणि जवानांसह केंद्रीय व राज्य राखीव बल, दंगल नियंत्रण पथक, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन, बॉम्बशोधक व नाशक पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. 

पूरग्रस्तांना मदत

यंदा साजऱ्या होणाऱ्या अनेक दहीहंड्या या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. सण उत्साहातच साजरे व्हायला हवेत. मात्र त्या उत्साहातही दहीहंडी पथकं आणि आयोजकांनी दाखवलेला मदतीचा पुढाकार कौतुकास्पद आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा