Advertisement

आवाज घटला, पण डेडलाइनचा विसर


आवाज घटला, पण डेडलाइनचा विसर
SHARES

मुंबई - यंदा मोठ्या आवाजाचे फटाके गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी उडवण्यात आलेत. गेल्या वर्षी आवाजाची कमाल मर्यादा 123 डेसिबल्स नोंद करण्यात आली होती. यावर्षी दिवाळीच्या तीन दिवसांत 113.5 डेसिबल्स इतकी आवाजाची कमाल मर्यादा नोंद झालीये. आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी ही माहिती दिली. यासाठी सुमेरा यांनी मुंबईकरांचं कौतुक केलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही पत्राद्वारे अभिनंदन केलंय.
मरिन ड्राइव्ह परिसरात सर्वाधिक आणि मोठ्या आवाजाचे फटाके उडवले गेल्याचं आवाजच्या अहवालातून समोर आलंय. वरळी सी फेसमध्ये सर्वाधिक फटाके उडवले गेले आहेत. केईएम, टाटा, वाडिया अशी महत्त्वाची रूग्णालयं असलेल्या परिसरात आवाजाची पातळी 101 डेसिबल्स होती. तसंच वेळेचं बंधनही या भागात पाळलं जात नसल्याचं समोर आलंय. 12 वाजेपर्यंत या परिसरात फटाके लावले जात आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा