Advertisement

शिवाजी पार्कच्या बाप्पाला 2100 आंब्यांचा महानैवैद्य!


शिवाजी पार्कच्या बाप्पाला 2100 आंब्यांचा महानैवैद्य!
SHARES

दादरमधल्या शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त देसाई बंधू आंबेवाले आणि देसाई बंधू यांची बहीण मीनल मोहाडीकर यांनी तब्बल 2 हजार 100 रत्नागिरी हापूस आंब्यांचा महानैवैद्य गणपती बाप्पाला अर्पण केला आहे. 

देसाई बंधू दरवर्षी अक्षय्य तृतीयेला पुण्यातला प्रसिद्ध गणपती असलेल्या दगडूशेट हलवाई गणपतीला 6 वर्षांपासून आंब्याचा महानैवैद्य देतात. यंदा उद्यान गणेशाला आंब्याचा महानैवैद्य देण्याचे त्यांचे पहिलेच वर्ष आहे.

शुक्रवारी सकाळी 8ची आरती झाल्यानंतर मंदिरात आंब्यांची आरास करण्यात आली आहे. ही आंब्यांची आरास शनिवारी रात्री 11 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. रविवारी हे आंबे अनाथाश्रम आणि मंदिरात येणाऱ्या गणेश भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत.

"या वर्षीपासून दरवर्षी अशीच आंब्यांची आरास गणेश मंदिरात करण्यात येणार आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात केली जाते. त्यामुळे बाप्पाला आंब्यांचा प्रसाद ठेवायचे ठरवले होते. यंदा पहिलंच वर्ष असूनही गणेश मंदिराचे व्यवस्थापक संजय आईर आणि मंदिराचे विश्वस्त ट्रस्टी यांनी मोठी मदत केली," अशी माहिती आंब्यांची आरास करणाऱ्या मीनल मोहाडीकर यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा