सिद्धिविनायका..पाव रे बाबा !

 Ravindra Natya Mandir
सिद्धिविनायका..पाव रे बाबा !
सिद्धिविनायका..पाव रे बाबा !
सिद्धिविनायका..पाव रे बाबा !
सिद्धिविनायका..पाव रे बाबा !
See all

प्रभादेवी - नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी यासाठी मुंबईतल्या प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रविवारी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. एक जानेवारीच्या पहाटेपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी रांग लावली होती.

मुंबई शहर उपनगर आणि मुंबई बाहेरील भक्तांनी गर्दी केल्यामुळे दर्शनाची रांग सिद्धिविनायक मंदिरापासून आगरबाजारपर्यंत पोहचली होती. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी म्हणून भक्तांच्या गर्दीचा साधारण अंदाज घेऊन मंदिर संस्थानाने देखील काही बदल केले होते. दर्शनाला गर्दी होऊ नये म्हणून मंदिर रात्री दीडपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.

Loading Comments