Advertisement

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे खुले, भाविकांची गर्दी

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त येत असल्याचं पहायला मिळत आहे.

अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे खुले, भाविकांची गर्दी
SHARES

लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले करण्यात आले आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त येत असल्याचं पहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून सिद्धिविनायकाचे मंदिर बंद होते.

सोमवारी रात्री १.३० वाजता दर्शनला सुरुवात झाली. मंगळवारी संध्याकाळी ८.३० वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनसाठी खुले राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली होती.

अंगारकीनिमित्त भाविकांना मंदाराच्या सिद्धी आणि रिद्धी या दोन्ही प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, ज्या भाविकांकडे ऑनलाईन पास नाही, त्यांना श्री सिद्धिविनायकाचं दर्शन मिळणार नाही. तसेच व्हॉट्सअपद्वारे फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉर्ट दाखवणाऱ्या भाविकांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. महत्वाचं म्हणजे, भाविकांना मंदिरात हार, फुल, नारळ, पूजेची सामर्गी आणि प्रसाद घेऊन जाण्यास मनाई करण्यात आलीय.

  • मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारकी संकष्टी असल्यामुळे समोवार मध्यरात्री ०१: ३० ते ०३.०० वाजेपर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश दिला गेला.
  • त्यानंतर मंगळवारी पहाटे ०३:०० वा. ते ०४.०० वा. मंदीर आरतीसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
  • मंगळवारी पहाटे ०४:०० ते दुपारी १२:०० वा. मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.
  • मंगळवारी दुपारी १२:०० वा. ते १२.३० वा मंदिर श्रींच्या नैवेद्यासाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
  • मंगळवारी दुपारी 12.30 वा सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील.
  • मंगळवारी सायंकाळी ०७:०० ते रात्रौ ०८.३० वाजेपर्यंत भाविकांसाठी दुरुन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • मगळवारी रात्री ०८:०० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत श्रींची महापूजा,नैवद्य आणि महाआरती होणार आहे.
  • रात्री शेजारती नंतर भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात येईल.

गेल्य दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यातील काही मंदिरे उघडण्यात आली मात्र, अद्यापही सिद्धिविनायक मंदिर बंद होते. त्यामुळे बाप्पाचे दर्शन घेता आले नाही.

पण अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराचे दरवाजे उघडल्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर बाप्पाचे दर्शन भाविकांना घेता आले.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा