Advertisement

महाराष्ट्रात दोन दिवस साजरी होणार धनत्रयोदशी; जाणून घ्या मुहूर्त

महाराष्ट्रामध्येही दोन दिवस धनत्रयोदशी साजरी होणार असल्याचं दाते पंचांगामध्ये सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात दोन दिवस साजरी होणार धनत्रयोदशी; जाणून घ्या मुहूर्त
SHARES

दोन वर्षांच्या कोरोना निर्बधांनंतर पहिल्यांदाच एवढ्या उत्साहात दिवाळी साजरी होत आहे. आज धनत्रयोदशीचा दिवस असला तरी नेमकी धनत्रयोदशी कधी आहे यासंदर्भात तिथी दोन दिवसांमध्ये विभागून आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते, असं दाते पंचांगामध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्रामध्येही दोन दिवस धनत्रयोदशी साजरी होणार असल्याचं दाते पंचांगामध्ये सांगण्यात आलं आहे.

२२ ऑक्टोबर २०२२ रोजी शनिवारी द्वादशी समाप्ती सायंकाळी ६ वाजून तीन मिनिटांनी आहे. सायंकाळी ६ वाजून तीन मिनिटांनंतर सूर्यास्त होत असलेल्या गावांमध्ये २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. तसेच काही प्रदेशांमध्ये दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच रविवारी धनत्रयोदशी आहे.

२२ ऑक्टोबरला इथे होणार
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूरसह संपूर्ण कोकण, गोवा, गोध्रा सोडून संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगांव, शिरसी, उडपी, मंगळूर या प्रदेशांमध्ये २२ ऑक्टोबर रोजी शनिवारी धनत्रयोदशी साजरी करावी.

२३ ऑक्टोबर इथे होणार
सोलापूर, नागपूरसह अकोला, अमरावती, अहमदनगर, इंदापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, यवतमाळ, लातूर, वर्धा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदर, अथणी, हुबळी, धारवाड, बेंगळूर, म्हैसूर संपूर्ण तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, जैसलमेर सोडून संपूर्ण राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या प्रदेशांमध्ये २३ ऑक्टोबर रोजी रविवारी धनत्रयोदशी आहे.हेही वाचा

डोळ्यांचे पारणे फिटेल 'अशी' मनसेची शिवाजी पार्कमधील रोषणाई, पहा फोटो

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा