Advertisement

दादरमध्ये 'सरळ कलश' ठेऊन उभारली गुढी


दादरमध्ये 'सरळ कलश' ठेऊन उभारली गुढी
SHARES

दादर - शिवाजी पार्क येथे फॅन फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच सरळ कलश लावून गुढी उभारण्यात आली. धनराज वंजारी यांनी सरळ कलश लावून गुढी उभारण्याची संकल्पना राबवली. 

चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभी करून नववर्ष साजरा करतो. पण हिंदू संस्कृतीनुसार आपण ज्या पद्धतीने गुढी उभी करतो तो शुभ संकेत नाही. कलश उलटा करणे म्हणजे अशुभ मानलं जाते. प्रसिद्ध हिंदू धर्मग्रंथांमध्ये देखील या बाबत कुठेच काही माहिती आढळत नाही. याबाबत आजही गूढ कायम आहे. म्हणून आपण कुठेतरी खरी संस्कृती जपण्याच्या दृष्टीकोनातून हिंदू संस्कृतीनुसार शुभ संकेत देणारी सरळ कलश पूजा करत गुढी उभी केली आहे.

- धनराज वंजारी

वंजारी हे चार वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलातून निवृत्त झाले असून ते सहायक पोलीस आयुक्त होते. हल्ली ते शिवाजी पार्क येथे फॅन फाऊंडेशनच्या वतीने समाजकार्य करत असतात. त्यांच्या सोबत अनेक मंडळी या फाऊंडेशन सोबत जोडले गेले आहेत. समाजप्रबोधनार्थ अनेक नवनवीन विषय फाऊंडेशनच्या माध्यमातून घेत असतात आणि या वर्षी पाडवा अनोख्या पद्धतीने साजरा करून एक चांगला जनसंदेश द्यायचा प्रयत्न धनराज वंजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा