साडी द्या, कंदील घ्या! आयडिया असावी तर अशी

सध्या साडीनं बनवलेला कंदील सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. हे कंदील साधेसुधे नाहीत, तर पैठणी, पेशवाई, मधुबनी, अशा असंख्य साड्यांच्या कापडापासून बनवलेले हे अनोखे कंदील आहेत. या कल्पकतेतून 'साडीघर'ने प्लास्टिकच्या कंदीलाला चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

  • साडी द्या, कंदील घ्या! आयडिया असावी तर अशी
SHARE

आतापर्यंत साड्यांपासून बनवलेल्या पर्स, मोबाईल कव्हर किंवा इतर वस्तू आपण पाहिल्याच असतील. पाहिल्या काय अगदी वापरल्याही असतील. पण पण दादरमधील 'साडीघर' मात्र एक भन्नाट संकल्पना घेऊन आलं आहे. या संकल्पनेला काही तोडच नाही. साडीघरनं यावर्षी साड्यांपासून आकाश कंदील बनवले आहेत. हे इकोफ्रेंडली कंदील प्लास्टिकला चांगलाच पर्याय ठरू शकतील.


साड्यांचे आकर्षक कंदील

रोषणाई आणि रंगांचा सण म्हणजे दिवाळी! अंधाराकडून प्रकाशाकडे, तेजाकडे नेणारा हा सण! दिवाळीसाठी वेगवेगळ्या आकारांचे आकाश कंदील बाजारात विक्रीला आले असले, तरी सध्या साडीनं बनवलेला कंदील सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत. हे कंदील साधेसुधे नाहीत, तर पैठणी, पेशवाई, मधुबनी, अशा असंख्य साड्यांच्या कापडापासून बनवलेले हे अनोखे कंदील आहेत. या कल्पकतेतून 'साडीघर'ने प्लास्टिकच्या कंदीलाला चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

दादरच्या साडीघर या दुकानाचे मालक राजन राऊत यांचा मुलगा गौतम गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या वडिलांना साडीच्या दुकानात मदत कर आहे. साडीचे वेगवेगळे पॅटर्न, डिझाईनं, रंगसंगती यात निपुण असलेल्या गौतमला एका महिन्यापूर्वी साडीपासून कंदील बनवण्याची कल्पना सुचली. ही कल्पना त्यांनी त्याच्या वडिलांना बोलून दाखवताच त्यांनीही त्याला लगेचच होकार दिला. त्यानंतर गौतमचा मेहुणा सुमित नाईकडे यासोबत मिळून त्यांनी हे साडीचे कंदील बनवायला सुरूवात केली.


पुढच्या वर्षी साडी द्या, कंदील घ्या!

यंदा साडीपासून कंदील बनवण्याचा पर्याय हिट झाल्यानंतर पुढच्या वर्षीपासून जुन्या साड्या द्या आणि कंदील घेऊन जा असा हटके पर्याय ग्राहकांपुढे ठेवणार आहोत. एका साडीपासून अंदाजे ३ ते ४ कंदील बनवता येतात. त्यामुळं यंदा जर तुम्हाला घरी पर्यावरणपुरक आणि वेगळा कंदील घेऊन जायचा असेल तर नक्कीच साडीच्या कंदीलचा विचार केला जाऊ शकतो.

- गौतम राऊत, मालक, साडीघर


प्लास्टिकला उत्तम पर्याय

सुमित दरवर्षीच कागदाचे कंदील बनवत असल्यानं त्याला कंदील बनवण्याची पद्धत माहीत होती. त्यानुसार त्यांनी सुरूवातीला त्यांच्याकडीलच नव्या कोऱ्या साडीपासून फक्त दोन ते तीन कंदील बनवले. हे कंदील त्यांनी आजूबाजूच्या आणि काही जवळच्या नातेवाईकांना दाखवताच त्यांना कंदील फारच आवडले.

त्यानंतर मग गौतम आणि सुमितनं मिळून साडीपासून फक्त २०० ते ३०० कंदील बनवण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी काही कंदील बनवून विक्रीसाठी दुकानात लावले. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी तयार केलेले बरचसे कंदील विकले गेले आणि या कंदीलाला ग्राहकांची मागणीही वाढू लागली. विशेष म्हणजे या कंदीला किंमत ५०० ते ८०० रुपयांपर्यंत असल्यानं ग्राहकवर्गही त्याला विशेष पसंती दर्शवत आहेत.हेही वाचा-

आकाश कंदील, पणत्यांनी बाजारपेठा फुलल्या

दिवाळी भेटीसाठी सुकामेव्याची चलतीसंबंधित विषय
ताज्या बातम्या