Advertisement

आकाश कंदील, पणत्यांनी बाजारपेठा फुलल्या

नवरात्रोत्सव संपला की लगेचच दिवाळीच्या तयारीला सुुरुवात होते. दिवाळीच्या खरेदीसाठी दादर, हिंदमाता, मश्चिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट, वांद्रे, कुर्ला यांसह सर्वच ठिकाणी मुंबईकरांची गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी लक्षात घेता आता दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे.

आकाश कंदील, पणत्यांनी बाजारपेठा फुलल्या
SHARES

दिवाळी अगदी काही दिवसांवरच असल्याने सर्वत्र या सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. घरातील साफसफाईपासून ते नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.

नवरात्रोत्सव संपला की लगेचच दिवाळीच्या तयारीला सुुरुवात होते. दिवाळीच्या खरेदीसाठी दादर, हिंदमाता, मश्चिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट, वांद्रे, कुर्ला यांसह सर्वच ठिकाणी मुंबईकरांची गर्दी दिसून येत आहे. ही गर्दी लक्षात घेता आता दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे.

दिवाळीच्या निमित्तानं बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार, यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहे. या पणत्यांची किमंत १० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहे.

आकर्षक कंदील

दिवाळीच्या निमित्तानं वेगवेगळ्या डिझाइनचे कंदील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही कंदीलामध्ये आकाशकंदील, कापडी कंदील, स्टार, यासंह पारंपारिक कंदील बाजारात विक्रीसाठी आले आहे. त्याशिवाय बच्चे कंपनीसाठी छोटा भीम, डोरेमॉन, नोबिता यांसह विविध कॉर्टुनचे कंदीलही बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या कंदीलांची किंमत २०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत आहे.

रांगोळ्यांचे स्टॉलही सजले

दादरसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्यां उपलब्ध झाल्या असून १० रुपयांपासून ५० रुपयांच्या रांगोळ्यांची पाकीटं विकली जात आहेत. त्याशिवाय धकाधकीच्या जीवनात रांगोळी काढण्यासाठी वेळ न मिळणाऱ्या गृहिणींसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे रांगोळ्यांचे साचे, रेडिमेड रांगोळ्याही उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा - 

दिवाळीला महागाईचा तडका, सर्वसामान्यांचं दिवाळं निघणार 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा