Advertisement

दिवाळी भेटीसाठी सुकामेव्याची चलती

दिवाळी भेटीसाठी सध्या बाजारात काजू, बदाम, पिस्ता यांसारख्या इतर सर्व सुक्यामेव्याची आवक वाढली असून सद्यस्थितीत सरासरी २५० टन मालाची आवाक होत आहे. सध्या काजू आणि बदामाची आवक सर्वाधिक असून होलसेल मार्केटमध्ये काजूचे दर ८०० ते १२०० रुपये किलो इतके आहेत.

दिवाळी भेटीसाठी सुकामेव्याची चलती
SHARES

दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्व मुंबईकर अगदी जोमाने कामाला लागले आहेत. नवीन कपडे, कंदील, पणत्या यांसारख्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. दिवाळीच्या निमित्तानं नातेवाईक, जवळची माणसं, कर्मचारी या सर्वांना भेटवस्तू दिल्या जातात. यंदा दिवाळीची भेट म्हणून बरेच जण मिठाईऐवजी सुकामेव्याला पसंती देत असून सध्या सुकामेव्याची चांगलीच चलती आहे.


सुक्या मेव्यांचे दर

दिवाळी भेटीसाठी सध्या बाजारात काजू, बदाम, पिस्ता यांसारख्या इतर सर्व सुक्यामेव्याची आवक वाढली असून सद्यस्थितीत सरासरी २५० टन मालाची आवाक होत आहे. सध्या काजू आणि बदामाची आवक सर्वाधिक असून होलसेल मार्केटमध्ये काजूचे दर ८०० ते १२०० रुपये किलो इतके आहेत.

सध्या बाजारात येणारा काजू हा गोवा आणि कर्नाटकमधून येत असून बदामाची आयात अमेरिका, इराण आणि इतर देशांमधून केली जात आहे. दरम्यान सध्या होलसेल मार्केटमध्ये बदामाचे दर ८०० ते ११०० रुपये किलो आहेत. त्याशिवाय आक्रोड, पिस्त, खजूर, खारीक याचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे दरही साधारण ५०० ते १००० रुपये किलो आहेत. विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवसात यात दुप्पटीनं वाढ होण्याची शक्यता आहे.


ग्राहकांची पसंती सुकामेवा

दिवाळीच्या निमित्तानं मॉल्स तसंच सुपरमार्केट या ठिकाणी विशेष सेल असल्यानं ग्राहक अधिकच आकर्षित होत आहेत. तसंच कित्येक वेळा दिवाळीच्या निमित्तानं दिलेल्या मिठाई ही भेसळयुक्त किंवा खराब होण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी ग्राहक सुकामेवा खरेदी करण्याकडे अधिक पसंती देत आहेत. त्याशिवाय आरोग्यासाठी सुकामेव्याचं महत्त्व अधिक असल्यानं सुकामेवा खरेदी करण्याकडे अधिक कल दिसत आहे.



हेही वाचा - 

दिवाळीनिमित्त गिरगांवात 'किल्ले बांधणी स्पर्धे'चं आयोजन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा