Advertisement

चीनी फटाक्यांना नो एन्ट्री, भारतीय बनावटीच्या फटाक्यांची मागणी वाढली!


चीनी फटाक्यांना नो एन्ट्री, भारतीय बनावटीच्या फटाक्यांची मागणी वाढली!
SHARES

दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर दिल्लीत बंदी आल्यानंतर मुंबईतही रहिवासी भागात फटाके वाजवू नयेत असा आदेश कोर्टाने दिल्यानंतर व्यापाऱ्यांसह खरेदी करणारे देखील संभ्रमात पडलेत. असे असतानाच चिनी बनावटीच्या फटाक्यांना बाजारपेठेत पूर्ण बंदी असल्याचे पहायला मिळत आहे. दादर, कुर्ला, मस्जिद बंदर इत्यादी ठिकाणी भारतीय बनावटीच्या फटाक्यांना विशेष मागणी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.



फटाके भारतीय बनावटीचे असले तरी लोकांची खरेदीसाठी गर्दी पहायला मिळत आहे. सर्वसामान्य लोकांना परवडतील, अशा 10 रुपयांपासून फटाके बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तर 10-20 हजार फटाक्यांच्या लांबच लांब 50 फुटांपेक्षा अधिक मोठ्या माळा 5 हजार रुपयांपासून वेगवेगळ्या किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.

1938 पासून मी फटाक्यांची विक्री करतो. नेहमी भारतीय बनवटीचे फटाके विक्रीसाठी ठेवतो. यंदा जीएसटीमुळे धंद्यावर परिणाम झाला आहे. पण सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून व्यावसायिकांनी फटाक्यांची खरेदी केली आहे. आम्ही होलसेल फटाके विकत असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. हा धंदा आनंद देणारा आहे. लहान मुलांना चॉकलेट दिल्यानंतर जेवढं आनंद होत नाही तितका आनंद फटाके गिफ्ट दिल्यामुळे होतो.
- अब्दुल्ला जिया, फटाके विक्रेता


हा आनंदाचा सण आहे. दिवाळीनिमित्त लोक खरेदी करतात. विक्रीसाठी ठेवण्यात आलेले सर्व फटाके भारतीय बनावटीचे आहेत. वेगवेगळ्या किंमतीचे सर्व प्रकारचे फटाके सध्या शॉपमध्ये उपलब्ध आहेत.
- सुरेशभाई, फटकेविक्रेता, स्टँडर्ड फायर वर्क


हेही वाचा - 

दिल्लीपाठोपाठ राज्यातही फटाकेबंदी?

दिवाळीत फटाके फोडताय? मग हे वाचा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा