डबेवाल्यांची आता आदिवासींसाठी कपडा बँक

मुंबई - इतरवेळी घराबाहेर ठेवलेला डबा नेण्याच्या धावपळीत असणारे डबेवाले सध्या वेळात वेळ काढून घरोघरी फिरत आहे... घरोघरी जाणाऱ्या या डबेवाल्यांच्या पिशवीत आता फक्त डबेच नाहीत, तर लोकांकडून गोळा केलेले कपडेही आहेत. कारण, या मॅनेजमेंट गुरूंनी रोटीबँकेच्या यशस्वी प्रयोगानंतर आता सुरू केलीये कपडा बँक. आदिवासींची दिवाळी अविस्मरणीय करण्यासाठी डबेवाल्यांनी हा नवा उपक्रम राबवलाय.

समाजाचं आपण देणं लागतो ही भावना प्रत्येकात असली, तरी प्रत्यक्ष कामातून वेळ काढून सेवाधर्म करण्यास प्रत्येकास जमतंच असं नाही. त्यामुळे डबेवाल्यांच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतोय..

तुम्हालाही डबेवाल्यांच्या या उपक्रमाला साथ द्यायची आहे? मग कोणत्याही रेल्वे स्टेशनवर सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत या डबेवाल्यांशी संपर्क साधा आणि त्यांच्या कपडा बॅंकेत कपडेरुपी दान जमा करा.

 

Loading Comments