Advertisement

मुंबईत 'या' ठिकाणी होणार रावण दहन


मुंबईत 'या' ठिकाणी होणार रावण दहन
SHARES

नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते दसऱ्याचं सोनं लुटायचे आणि रामलीलामध्ये रावणवध पहाण्याचे! असत्यावर सत्याचा विजय साजरा करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी ठिकठिकणी रामलीलांमध्ये प्रातिनिधिक स्वरुपात रावणवध केला जातो. याच दिवशी श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवल्याची आख्यायिका आहे.


मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रामलीलांचं आयोजन

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटीवर गेल्या 54 वर्षांपासून श्री आदर्श रामलीला समितीद्वारे रामलीला आयोजन केलं जातं. यंदा संध्याकाळी 7 वाजेपासून हा कार्यक्रम सुरु होईल. या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने जत्रेचे आयोजनही करण्यात आले आहे.


आझाद मैदान

गिरगाव चौपाटीप्रमाणेच आझाद मैदान इथेही संध्याकाळी 6 वाजेपासून प्रातिनिधीक स्वरुपात रावण वध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून या ठिकाणी पोहोचणं रामभक्तांसाठी सर्वात सोयीचं ठरेल.


गांधी मैदान
मर्यादा पुरुषोत्तम रामलीला समितीतर्फे गांधी मैदानावर रामलीलाचे आयोजन करण्यात आले आहे. या रामलीलाचे विशेष म्हणजे रावणाचा पुतळा थेट दिल्लीहून मागवला जातो. पूर्व उपनगरांमधील रामभक्त मुंबईकर चेंबुरजवळील गांधी मैदानावर रामलीला पहाण्यासाठी जाऊ शकतात.


विक्रोळी पार्कसाईट

विक्रोळी पार्कसाईट परिसरातील छत्रपती शिवाजी मैदानावर श्री रामलीला उत्सव समितीतर्फे दरवर्षी रामलीलाचे आयोजन केले जाते. यंदाही मोठ्या जल्लोषात संध्याकाळी 6 वाजता प्रातिनिधीक स्वरुपात रावणवधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दसऱ्यानिमित्ताने इथे जत्राही भरवण्यात आली आहे.


राहुल स्पोर्ट्स ग्राऊंड, भाईंदर
भाईंदरमधील राहुल स्पोर्ट्स ग्राऊंडमध्येही संध्याकाली 7 वाजता प्रातिनिधीक रावण वधाचं आयोजन करण्यात आलं आहे. भाईंदर रेल्वेस्थानकापासून अवध्या काही मिनिटांवर हे मैदान आहे. श्री मीरा-भाईंदर रामलीला समितीतर्फे या रामलीलाचं आयोजन केलं जातं.


रामलीला मैदान, मालाड

श्री रामलीला प्रचार समितीतर्फे मालाडच्या जकारिया रोड परिसरात रामलीलाचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही बरोबर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रातिनिधीक स्वरुपात रावण वध केला जाईल असं समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा