Advertisement

गणेश भक्तांची पसंती थर्माकोल मखरांनाच

दादर पश्चिम येथील छबिलदास गल्लीमध्ये थर्माकोलच्या मखरांच्या विक्रीचे स्टॉल्स लागले असून याठिकाणी मखर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली आहे. मात्र, थर्माकोलच्या मखरांच्या तुलनेत यंदा पर्यावरण पुरक असलेल्या कागदी मखरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

गणेश भक्तांची पसंती थर्माकोल मखरांनाच
SHARES

मुंबईत प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आलेली असतानाही यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांची पसंती ही थर्माकोलच्या मखरांनाच अधिक असल्याचं दिसून येत आहे. थर्माकोल आणि  कागदी पर्यावरणपूरक मखरांच्या तुलनेत गणेशभक्त थर्माकोलचेच मखर खरेदी करत असून प्लास्टिक व थर्माकोल बंदीचा कोणताही परिणाम जनतेवर नसल्याचं दिसून येत अाहे. 




कागदी मखरांकडं दुर्लक्ष

गणेशोत्सवात मुंबईत थर्माकोलच्या मखरांचा वापर केला जाणार नाही, असं बोललं जात असतानाच यंदा मोठ्या प्रमाणात थर्माकोलची मखरे विक्रीसाठी बाजारात आली आहे. दादर पश्चिम येथील छबिलदास गल्लीमध्ये थर्माकोलच्या मखरांच्या विक्रीचे स्टॉल्स लागले असून याठिकाणी मखर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली आहे. मात्र, थर्माकोलच्या मखरांच्या तुलनेत यंदा पर्यावरण पुरक असलेल्या कागदी मखरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या मखरांनाच पसंती आहे.


थर्माकोलचे मखर स्वस्त

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोलच्या वापरावर बंदीबाबत जनजागृती केली आहे. त्या तुलनेत मुंबईकरांमध्ये तसा बदल झालेला नाही. थर्माकोलच्या मखरांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या मते, हे शेवटचं वर्ष असून यापुढे ते याची विक्री करणार नाहीत. त्यामुळे पुढच्या वेळी काही नवीन पध्दतीचे मखर आणले जातील.  तर कागदी पर्यावरणपूरक मखरांच्या तुलनेत थर्माकोलचे मखर स्वस्त असल्यामुळे आणि आकर्षक असल्यामुळे आमची पसंती या मखरांनाच असल्याचं गणेशभक्तांचं म्हणणं आहे.


जनतेवर कारवाई नाही

महापालिकेच्या प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत जनजागृती करणारे समन्वयक तसेच सहाय्यक अायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, आतापर्यंत आम्ही दुकानदारांवरच कारवाई करत आलो आहोत. थेट जनतेवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळेच जनतेमध्ये तेवढी भीती राहिलेली नाही. तसंच कागदी मखरांच्या तुलनेत थर्माकोलचे मखर स्वस्त असल्यामुळेही नागरिक ते खरेदी करत असावेत. परंतु काही अंशी कागदी मखर खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढू लागला आहे, हेही सुचिन्ह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


भक्तांना अावाहन

बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी थर्माकोलचे मखर समुद्रात न टाकता निर्माल्य कलशात टाकलं जावं, असं आवाहन किरण दिघावकर यांनी केलं आहे. कारण आपण समुद्रात टाकलेलं थर्माकोल पुन्हा पाण्याबरोबरच चौपाटीवर येवून त्याला विद्रुप करतं. त्यामुळे थर्माकोल समुद्रात तसंच नाल्यात जाणार नाही याची काळजी मुंबईकरांनी घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा