म्हणून साजरी करतात होळी...

मुंबई - होळी...उत्सव रंगाचा..संपू्र्ण भारतभर होळी हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. पण, आता कुठेतरी ही संस्कृती लोप पावताना दिसत आहे. आपल्याला माहीत तरी आहे का आपण होळी हा सण का साजरा करतो. आपल्याला ठाऊक आहे का भारतीय पुरातनात होळी हा किती महत्त्वाचा सण आहे? 

होळी या सणाला 'होळी पौर्णिमा' असंही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड आणि रंगपंचमी अशी या उत्सवाची विभागणी होते. तसंच कोकणात शिमगोत्सव केला जातो. होळी म्हणजे मनुष्याच्या मनातील वाईट विचार होळीप्रमाणे आगीत जाळून राख होतात अशी कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. 

या व्हीडिओतून आम्ही तुम्हाला हाच संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. हा व्हीडिओ पाहून नेमकं होळीचं महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि उत्साहात, आनंदात आणि रंगात होळी साजरी करा..मुंबई लाइव्हकडूनही आपणा सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा...

Loading Comments