योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याचा मुंबईतही जल्लोष

बोरीवली - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची वर्णी लागल्यानंतर मुंबईतही त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. बोरीवली पूर्व येथील गोरक्षधाम मठात महंत योगी हरिनाथ यांनी आपल्या शिष्यांसोबत आनंद साजरा केला. यावेळी मिठाई वाटण्यात आली. 

तसेच नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचे दावेदार हे आदित्यनाथ असतील असा विश्वासही यावेळी योगी हरिनाथ यांनी व्यक्त केला. मुंबईत जेव्हा आदित्यनाथ येतात तेव्हा ते योगी हरिनाथ यांच्या मठात विश्राम करतात.  त्यामुळे मुंबईतल्या गोरक्षक धाममधील लोकांना आदित्यनाथ यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

Loading Comments