Advertisement

धोतर, उपरण्यातल्या बाप्पांचा ट्रेंड


धोतर, उपरण्यातल्या बाप्पांचा ट्रेंड
SHARES

गणेशोत्सवाला अवघे ६ दिवस उरले आहेत. मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. परंतु, सध्या बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत सार्वजनिक गणेश मूर्तींनाच धोतर आणि उपर्ण नेसवण्यात येत होतं. मात्र यंदा घरगुती गणपती बाप्पांनाही धोतर आणि उपर्ण नेसवलं जात आहे.


याला गणेशभक्तांचा प्रतिसाद

चिंचपोकळी येथील 'सुहासिनी आर्ट' या घरगुती गणेश मूर्तीच्या कार्यशाळेत मूर्तींना धोतर आणि उपर्ण नेसवलं जात आहे. लाल, पिवळा, हिरवा आणि जांभळा यांसारख्या वेगवेगळ्या रंगाचे धोतर बाप्पांना नेसवलं जात आहे. त्याचप्रमाणं गणेशभक्तांचाही याला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसंच जांभळ्या रंगाच्या धोतरला बाजारात गणेश भक्तांकडून अधिक पसंती मिळत आहे, असं सुवासिनी आर्ट्सचे हसमुख मकवाना यांनी सांगितलं.

'सुहासिनी आर्ट' या घरगुती गणेश मूर्तीच्या कार्यशाळेत धोतर नेसवलेल्या दीड फूट मूर्तीची किंमत ३००० रुपये आहे, तर दोन फूट मूर्तीची किंमत ५००० रुपये आहे. तसंच, अडीच फूट गणपतीच्या मूर्तीची किंमत ५००० रुपये आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत फक्त सार्वजनिक गणेश मूर्तींनाच धोतर आणि उपर्ण नेसवण्यात येत होतं. मात्र, यंदा आम्ही घरगुती गणेश मूर्तींना धोतर आणि उपर्ण नेसवत आहोत. तसंच ग्राहकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- हसमुख मकवान, सुवासिनी आर्ट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा