Advertisement

मुंबईतील आकर्षक इकोफ्रेंडली बाप्पा


मुंबईतील आकर्षक इकोफ्रेंडली बाप्पा
SHARES

'गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया... पूढच्या वर्षी लवकर या' असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, १० दिवस मुक्कामासाठी आलेल्या काही इकोफ्रेडली बाप्पांनी मुंबईसह राज्यभरातील गणेश भक्तांच्या मनात राज्य केलं आहे. पाहूयात या बाप्पाची एक झलक...

२० फूट कागदी मूर्ती

लालबाग येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं कागदी लगद्याची १२ फूटांची गणेशमूर्ती साकारली आहे. तेजुकाया मंडळाची ही गणेशमूर्ती यंदा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे. तसंच, या मूर्तीची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

प्लास्टीकचा बाप्पा

स्वच्छ भारत उपक्रमाशी प्रेरित होऊन नवी मुंबईच्या सीवुड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये बाप्पाची हटके मूर्ती स्थापित केली आहे. प्लास्टीकच्या बाटल्यांपासून साकारण्यात आली आहे. कलाकार आबासाहेब शेवाळे आणि त्यांच्या टीमनं ही मूर्ती तयार केली आहे. १० हजारपेक्षा जास्त प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करून गणेशमूर्ती बनवण्यासाठी आली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लाल, काळ्या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात रंगविलेल्या २०० मिलीच्या बाटल्या वापरण्यात आल्या आहेत.

कडधान्यातला बाप्पा

अनेक लहान मुलं जंक फूडचं प्रचंड प्रमाणात सेवन करत असून, कडधान्यांकडं त्यांनी पाठ फिरवली आहे.त्यामुळं जंक फूडपासून होणारा त्रास टाळण्यासाठी तसंच लहान मुलांना कडधान्यांच महत्वं कळावं यासाठी मुंबईतल्या मालाड येथील 'श्री साई दर्शन मित्र मंडळात' कडधान्यांच्या रुपातला बाप्पा अवतरला आहे.

बर्फात साकारलेला बाप्पा

स्नो वर्ल्डमध्ये बर्फाचा वापर करून बाप्पाची आकर्षक मूर्ती साकरण्यात आली आहे.

मालाड इथं पुस्तकात साकारलेला बाप्पा

रायपाडा मित्र मंडळानं पूस्तकात बाप्पाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती साकारण्यासाठी ८०० पस्तकं पेन्सिल, पट्टी, ड्रॉइंग प्लेट या वस्तूंचा वापर करण्यात आला होता. 

कॉटन आणि पेपरचा बाप्पा

डी. एन, रोडचा बाप्पा हा कॉटन आणि पेपर पासून बनविण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा