Advertisement

केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव यंदा 'असा' होणार साजरा

मुंबईतील गणेशोत्सवाची सुरुवात केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवानं झाली.

केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव यंदा 'असा' होणार साजरा
SHARES

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा फटका सर्वच उद्योगधंदे, व्यवसायांना बसला आहे. तसंच, आता सण-उत्सवांवर ही कोरोनाचं सावट असून, यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यात निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईतील केशवजी नाईक चाळीतील कार्यकर्त्यांनी एका घरात गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे.

मुंबईतील गणेशोत्सवाची सुरुवात केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सवानं झाली. त्यानंतर मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशवजी नाईक चाळ या सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळानं यंदा गणेशोत्सव एका घरात साजरा करण्याचं ठरवलं आहे. ढोल ताशा तसंच, लाऊडस्पीकरचाही वापर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

केशवजी नाईक चाळीतील गणेशमूर्ती कायम २ फूट उंच असते. तिची स्थापना चाळीच्या परिसरात झाली होती. यंदा गणेशोत्सव एका खोलीत साजरा करण्याचं या चाळीतील कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे. या चाळीतील एका रहिवाशाचं घर सध्या रिकाम असून, या घरात गणेशोत्सवासाठी जागा देण्याची विनंती केली आहे. ही खोली १६० चौरस फूट आहे. येथील संस्थेचे २ कार्यकर्तेच आरतीसाठी त्या खोलीत जातील. तसंच, प्रवेशद्वाराजवळ स्क्रीन ठेवली जाणार आहे. त्यावरुन श्री गणेशाचं दर्शन घेता येणार आहे.

दरवर्षी लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. पण यंदा कोणतेही कार्यक्रम होणार नाही. चौघे जण श्री गणेशाची मूर्ती घेऊन येतील. स्क्रीनवरुनच दर्शन घेण्याची विनंती केली आहे. परिसरात कृत्रिम तळं तयार करणार आहोत. त्यात साधेपणानं श्री गणेशाचं विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती येथील कार्यकर्त्यानं दिली.



हेही वाचा -

राज्यात ९८९५ कोरोना रुग्णांची दिवसभरात नोंद, पाहा तुमच्या भागातील रुग्णांची संख्या किती

मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा