Advertisement

आतुरता आगमनाची; यंदाही बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्तींची चर्चा

गणेशोत्सवासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी गणपतीच्या आगमनापूर्वीची लगबग पाहायला मिळत आहे.

आतुरता आगमनाची; यंदाही बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्तींची चर्चा
SHARES

गणेशोत्सवासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी गणपतीच्या आगमनापूर्वीची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी यंदाच्याही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यंदा पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळत आहे.

रविवार ५ सप्टेंबर रोजी मुंबईसह आसपासच्या परिसरातील अनेक गणेशोत्सव मंडळातील गणरायाचे आगमन होणार आहे. यासाठी मुंबईच्या लालबाग परळ परिसरात सकाळ पासून गणेश भक्तांची ये-जा पाहायला मिळत आहे. 

सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळं गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जवळपास सहा दिवसांनी प्रत्येक घराघरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. मंडपाच्या सजावटीपासून घराघरात गणपतीची आरास करण्यापर्यंत मोठ्या उत्साहात सर्व तयारी केली जात आहे. लाडका बाप्पाही आपल्या भक्तांच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक गणेशमुर्तींमध्ये विविध आकार, रंग, रुप पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा म्हटलं की सिंहासन किंवा पाटावर बसलेली पारंपारिक मूर्ती आपल्या नजरेसमोर येते. पण यंदा मात्र या पारंपारिक मूर्तीला थोडासा हटके लूक देण्याचा प्रयत्न मूर्तीकारांनी केला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा